स्थानिक समस्या

 

स्थानिक पर्यावरण समस्या
कणेगांवातील स्थानिक पर्यावरणाच्या समस्या आहेत त्या खालीलप्रमाणे 

समस्या क्र.१ 

पर्यावरणाच्या दृष्टीने कणेगांवला नेहमी भेडसावणारी समस्या म्हणजे ÷महापूर' होय.  हा महापूर या गावातील सर्वस्व हिरावून नेतो.  

उपाय 

  • महापूर ही नेहमी भेडसावणारी समस्या असू त्यापासून सुटकेसाठी या गावचे पुनर्वसन करणे ही काळाची गरज बनली आहे, परंतु या गावातील सर्व जमिन पिकाउ असल्यामुळे व गावास माळ अथवा पडीक जमिन नसल्यामुळे पुनर्वसनात अनेक अडथळे आहेत.  त्यावर मात करण्यासाठी संपादीत जमिनी मध्येच दोन गुंठयाचे प्लॉट काढून त्यात दुमजली घरे बांधून जागेचा प्रश्न मिटवू शकतो.  

शासन स्तरावरील उपाय 

  • शासनाने लवकरात लवकर शासन धोरणानुसार प्लॉटचे वाटप करुन घरे बांधण्यास परवानगी द्यावी.  

समस्या क्र.२

मर्यादेपेक्षा जास्त उत्पादन काढण्यासाठी शेतक-यांनी रासायनिक खतांचा भरपूर प्रमाणात वापर केल्यामुळे ÷क्षारपड' जमिनीची समस्या निर्माण झाली आहे.   

उपाय

  • क्षारपड जमिनीत शेततळी खोडून ÷मत्सशेती' सारख्या व्यवसायास प्राधान्य द्यावे.  तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करुन शेणखत व सेंद्रिय खताचा वापर करुन या समस्येपासून सुटका होईल. 

शासन स्तरावर उपाय 
शासनाने रासायनिक खतांचा वापरावर मर्यादा आणाव्यात         

समस्या क्र.३

ग्रामीण भागात इंधन म्हणून जळणाचा वापर केला जातो.  यासाठी मोठया प्रमाणात वृक्षतोड केली जाते.  यामुहे जमिनीची धूप होवून तापमान वाढत आहे.  

उपाय

  • पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलाचा विचार करुण प्रत्येकाने आपापल्या परीने वृक्ष लागवडीस प्राधान्य देवून निसर्गाशी मैत्री करावी. 

शासन स्तरावर उपाय

  • शासनाने ÷जेवढी माणसे तेवढे वृक्ष' अशी योजना राबवून त्याची अंमलबजावणी करावी.  

समस्या क्र. ४

गावात घाणीचे साम्राज्य वसलेले असल्यामुळे येथे प्रदूषणाच्या अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते.  

उपाय

  • प्रत्येक कुटुंबाने आपले घर व परीसराची स्वच्छता राखावी.  मोकळया जागेत वृक्ष लागवड करावी.    

शासन स्तरावर उपाय

स्थानिक प्रशासनाने ÷संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान' राबवावे.  घंटा गाडीची व्यवस्था करावी.