भौगोलिक पार्श्वभूमी

कणेगांव वाळवा तालुक्यातील शेवटचे गांव सांगली – कोल्हापूर हद्दीवर वसले आहे.  येथून केवळ २७ कि.मी. अंतरावर कलानगरी कोल्हापूर हे शहर आहे.  गावाजवळून राच्च्ट्रीय महामार्ग क्र.४ जातो.  गावाशेजारी असणा-या महामार्गावरील पुलाचे बांधकाम ब्रिटिश राजवटीत झाले असून एप्रिल २००६ मध्ये या पूलाने १२.५ वर्षे पूर्ण केली आहेत.  ÷सुवर्ण चतुष्कोन योजनेअंतर्गत महामार्गाच्या चौपदरी करणातून वारणा नदीवर बांधण्यात आलेले नवीन पूल व जूने पूल याची तुलना केली असता जूने पूल आजही भक्कम असल्याचे दिसते.  कणेगांवला वारणा नदीचा सुमारे ३ किमी अंतराचा काठ लाभला आहे.  नदीच्या पाण्याच्या मुबलकतेमुळे या परीसरातील शेती नेहमी बहरलेली असते.  गावानजीक असलेल्या महामार्गामुळे शेतात उत्पादीत होणारा शेतीमाल तात्काळ कोल्हापूर, पुणे मुंबईच्या बाजारपेठेत नेता येतो.  त्यामुळे शेतक-यांच्या ताज्या शेतीमालास रास्त भाव मिळतो.  वरील सर्व भौगोलिक परिस्थितीमुळे कणेगांवचा विकास झपाटयाने घडून आला आहे.